अकोला : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी-नाले दुथडी वाहत असून विद्रुपा नदीला पूर आला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

अकोला जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी पावसाने अधिक जोर पकडला. विविध भागात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने नदी-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत ३७.९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. सर्वाधिक तेल्हारा तालुक्यात १४६.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. अकोट ३४.८, बाळापूर २४.७, पातूर १६.६, अकोला २५.४, मूर्तिजापूर २३ व बार्शीटाकळी २९.९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली.

हेही वाचा >>>विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस; भंडारा, गोंदियात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू, २७ जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिवरखेड-अकोट मार्गावरील नाल्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे बऱ्याच तासापासून हिवरखेड-अकोट मार्ग बंद झाला. तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथे विद्रुपा नदीला पूर आल्याने वाहतूक बंद झाली. तेल्हारा-वरवट मार्ग देखील बंद झाला. मुसळधार पावसामुळे सर्वत्र जलमय परिसर झाला आहे.