चंद्रपूर : राज्य सरकारने ६ सप्टेंबरला एक शासन निर्णय काढून सर्व शासकीय नोकऱ्या या कंत्राटीपद्धतीने भरल्या जाणार असून यासाठी खासगी ९ संस्थांना नोकरभरतीबाबतचे कंत्राट देण्यात आले आहे. राज्यातील तरुणांना देशोधडीला लावणारा हा शासन निर्णय असल्याने तरुणांनो या शासन निर्णयाची होळी करा, मोर्चे काढा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी केले.

राज्यातील ५ लाख १४ हजार जागा भरण्याचे कंत्राट खासगी संस्थांना दिले गेले असल्याने जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची लूटमार या संस्था करणार आहेत. त्यामुळे तरुणांनो आता पेटून उठा आणि शासन निर्णयाची होळी करा असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – टोंगेंचे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार, चंद्रपुरात ओबीसींचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

हेही वाचा – राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या स्थानावर; विनयभंग, छेडखानी, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे

चंद्रपूर महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनंसंदर्भात उशिरा का होईना पण माजी खासदार हंसराज अहिर काल बोलले. त्यांनी बोलले याचे कौतूकच आहे. मात्र त्यांनी पूर्णसत्य बोलायला हवे होते. अमृत पाणीपुरवठा योजनेच्या अपयशाचा पाढा अहिर यांनी एक बैठक घेऊन वाचले. यावेळी आजूबाजूला बसलेले काहीजण या योजनेतील कसे लाभार्थी ठरले याचाही उल्लेख अहिर यांनी करायला हवा होता. अमृत पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. ही योजना राबविण्यात आली तेव्हा जे मनपाच्या सत्तेत होते त्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली.