बुलढाणा : राज्यात मनमर्जी कारभार सुरू असून तिन्ही सत्ताधारी पक्षात सरकारी तिजोरी लुटण्याची स्पर्धा सुरू आहे. तिन्ही पक्षाचे ‘मुखींया’ तिजोरी लुटण्याचे काम करीत असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हे चित्र बदलण्यासाठी नागरिकांनी मंत्र्यांना गावबंदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा – यवतमाळ जिल्ह्याची पीक पैसेवारी ६१ पैसे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप

हेही वाचा – सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भ पंढरी शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज, रविवारी बारी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त वडेट्टीवार येथे आले होते. यावेळी ते म्हणाले, राज्यातील तीन पक्षांचे सरकार सर्वसामान्याच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वे नाही की त्यांना मदत नाही. बेरोजगारांची क्रूर थट्टा केली जात आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. गोरगरीब निराधारांना आधार उरला नाही. तिन्ही पक्षात सरकारी तिजोरी लुटण्याचे काम सुरू आहे. यामुळे या अन्यायग्रस्त समाज घटकांनी त्यांना गावबंदी करावी व रस्त्यावर फिरू देऊ नये. याशिवाय तुमचे प्रश्न, समस्या सुटणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.