नागपूर : संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी नागपूर येथील कंपनी सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. दुर्घटनेतील मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

हेही वाचा – “पाच कोटी काय, मला एक रुपयाही आला नाही”, महाएल्गार मेळाव्याबाबत समता परिषदेच्या विदर्भ संयोजकांची स्पष्टोक्ती

हेही वाचा – गझलकारांचे स्वतंत्र गझल संमेलन! मराठी साहित्य संमेलनात आणखी एका ‘विद्रोहा’ची भर

कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. यापूर्वीसुद्धा अशा घटना सदर कंपनीत घडल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच कंपनीमुळे परिसरातील पर्यावरणाचे होत असलेले नुकसान ही बाब गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन एसआयटी स्थापन करावी आणि दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावे ही आमची मागणी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करा – वडेट्टीवार

येथील परिस्थिती भयावह असून मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आहेत. कंपनीने सुरक्षा निकष पाळले नाही. येथे ५ हजार कर्मचारी काम करतात. त्यांना १२ हजार रूपये पगार देतात. स्फोटक बनवण्यासाठी अकुशल कामगार वापरले जात आहे. त्यांना किमान वेतनही दिले जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते म्हणाले, येथे दारूगोळा तयार होतो मात्र सुरक्षा व्यवस्थेची स्थिती फार वाईट आहे. मृतांच्या वारसांना ५० लाखांची मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एकाला नोकरी मिळाली पाहिजे. २२ ते २३ वर्षाच्या मुलींना प्रशिक्षण न देता कंत्राटी पद्धतीने कामाला लावण्यात आले आहे. सोलर कंपनीला ७० हेक्टर वनजमीनही देण्यात आली आहे. कंपनीत कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे वडेट्टीवार म्हणाले. २०१८ मध्ये येथे अशीच घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले.