बुलढाणा : संशयित चोरट्यांना गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत चौघे संशयित जखमी झाले. यावेळी जळगाव पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून चौघांची सुटका केल्याने संभाव्य अनर्थ टळला.

हेही वाचा – धक्कादायक.. प्रत्येक पाचव्या गर्भवतीला मधुमेह! कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड या गावी आज उत्तररात्री हा खळबळजनक घटनाक्रम घडला. मडाखेड येथे मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे गावकरी प्रामुख्याने युवक रात्रभर गस्त घालतात. रात्री उशिरा गस्त घालणाऱ्यांनी चौघांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. जळगाव पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून चौघांची सुटका केली. चारहीजणांना पकडून जळगाव जामोद पोलीस स्थानकात आणण्यात आले.