नागपूर : शहरातील सुशिक्षितांच्या वस्त्या व वसाहतींमध्ये मतदार नोंदणीचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षाही कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी याचा आढावा जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला तेव्हा नागपूर महानगरात नोंदणीला अतिशय अल्प प्रतिसाद असल्याचे लक्षात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या तुलनेत ज्यांच्याकडे सुशिक्षित व सुज्ञ नागरिक म्हणून बघितल्या जाते त्या वेगवेगळ्या सदनिकांमध्ये (सोसायटीमध्ये) राहणाऱ्या नागरिकांचा मतदार नोंदणी मोहिमेतील प्रतिसाद अत्यल्प आहे. २१ ऑगस्टपर्यंत विशेष मतदार नोंदणी अभियान सुरू आहे. या काळात निवासी संकुलासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
हेही वाचा – नागपूर: महामार्गालगतच्या वस्त्यांना अपघाताचा धोका, गतीरोधकही नाही
हेही वाचा – यवतमाळ : आठ महिन्यांत १६० शेतकरी आत्महत्या; कृषिमंत्री आज जिल्ह्यात, लक्ष देणार का?
विविध सोसायटीतील सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र लिहून आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या सोसायटीतील प्रत्येक सदनिकेमधील रहिवासी मतदार झाला अथवा नाही याची खातरजमा करावी.
