नागपूर : प्रचारफेरी व प्रचारसभांचा धडाका, घरोघरी जाऊन संवाद साधण्यावर भर आणि आरोप – प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दिवस अखेर उजाडला आहे. विविध विधानसभा मतदारसंघांमधील चुरशीच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले असून मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात तुरळक गर्दी पाहायला मिळत असून दुपारनंतर ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

मात्र उत्तर नागपूर मतदारसंघातील विनयालय शाळा,कस्तुरबा नगर येथील खोली क्रमांक २,बूथ क्रमांक ५९/५७ येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे नागरिक दोन तास मतदान करू शकले नसून अनेक मतदार परत गेले.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : चंद्रपुरात मतदान संथगतीने, चिमूर मतदारसंघात मात्र सर्वाधिक…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदारांचा आक्रोश

उत्तर नागपूर मतदार संघ यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये गोंधळ झाल्याचे लक्षात आले आहे. त्यानंतर आज विधानसभेसाठी मतदान सुरू असताना उत्तर नागपूर मतदारसंघातील विनयालय शाळा,कस्तुरबा येथील मतदान यंत्र बंद पडले. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.मात्र ते ही बंद पडल्याची माहिती आहे. यामुळे मतदार मतदान न करताच परतले. आता ही मशीन बंद असल्याने कसे होणार १०० टक्के मतदान? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.