वर्धा : मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, त्यांना माया लावा, देखभाल करा, अशी शिकवण देणारी आपली महान संस्कृती. मात्र त्यास काळिमा फासणारी ही घटना. विकृत मनोवृत्ती व त्यातून घडलेला हा बिभत्स प्रकार आहे. आपली वासनापूर्ती चक्क एका कुत्रीवर शमवणाऱ्या या नराधमांस काय म्हणावे ?
आर्वीत ही घटना मंगळवारी सकाळी घडली. आरोपीस आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुत्रीवर बलात्कार करणाऱ्या या विकृत नराधमचे नाव भानुदास राऊत असे आहे. तो आर्वी तालुक्यातील धनोडी नांदपूर येथील रहिवासी आहे. आर्वी शहरातील एका झूडपी भागात हा किळसवाना प्रकार आज सकाळी घडला आहे. हा नराधम कुत्रीस पकडून पायरीवर बसला. व त्याने आपली वासना पूर्ण केली. यावेळी कुत्री ओरडत होती. हा प्रकार पीपल्स फॉर ऍनिमल्स या संघटनेच्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तो मोबाईलमध्ये टिपला. तसेच आरोपीस पकडून आर्वी पोलिसांच्या हवाली केले. सध्या तो ठाण्यातच आहे. याप्रकरणी काय कारवाई करावी, याचा पोलिसांनाही पेच पडला आहे.
पोलीस अधीक्षक अनुराग जैन म्हणतात, या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांस चौकशी करण्यास आर्वीत पाठविले आहे. अधिक भाष्य करता येणार नाही. नव्या भारतीय दंड संहितेनुसार काय कारवाई करता येईल, हे तपासू. तर पीपल्स फॉर ऍनिमल्स संघटनेचे आशिष गोस्वामी म्हणतात की कठोर कारवाई झाली पाहिजे. कुत्री व आरोपी या दोघांची वैद्यकीय तपासणी आवश्यक ठरते. बलात्कार म्हणून ही बाब कारवाईसाठी योग्य ठरते, असे माझे मत आहे. कारण हा अत्यंत विकृत मानसिकतेचा माणूस असल्याची माहिती आहे. त्याने याच विकृतपणातून यापूर्वी दोन कुत्री मारून टाकल्याची माहिती मिळाली. म्हणून या नराधमांस ठेचलेच पाहिजे. सदर आरोपीचा हा प्रकार पाहणारे व त्यास पोलिसांच्या हवाली करण्यात पुढाकार घेणारे हे पीपल्स फॉर ऍनिमल्सचे कार्यकर्ते आहेत.
गुड्डू ठाकूर,तुषार साबळे,मिलिंद मसराम, अनिल माहुरे, विशाल उईके, रवी आत्राम,अनुराग राऊत, संतोष पडोळे,संकेत मनोरे,रवी कोहरे, महावीर ठाकूर यांनी हा प्रकार उजेडात आणला. या घटनेने आर्वी शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर पशुप्रेमी नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच आता या प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रकार खपवून घेणार नाही. या आरोपीस जामीन पण मिळू नये, अशी भूमिका आशिष गोस्वामी यांनी दिली.