वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ते राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. सायंकाळी उशिरा पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

यावेळी शरद पवार, जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रा, सुरेश देशमुख, राजू तिमांडे, सुधीर कोठारी, अतुल वांदिले, किशोर माथानकर, सुनील राऊत हे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नाराज नेत्यांशी प्रथम चर्चा झाली. त्यांची नाराजी दूर करण्यात आल्यानंतर काळे यांना बोलावून घेण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला. त्यामुळे अमर काळे हेच आता आघाडीचे उमेदवार राहणार हे निश्चित झाले आहे.