वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे विजयी झाले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निकाल घोषित केला. उमेदवार अमर काळे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मतमोजणी निरीक्षक अभय नंदन अंबास्था व दिनेश कुमार जांगीड उपस्थित होते.

उमेदवार निहाय मतदान पुढीलप्रमाणे : अमर शरदराव काळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), एकूण मते ५ लाख ३३ हजार १०६, डॉ. मोहन रामरावजी राईकवार (बहुजन समाज पार्टी) एकूण मते २० हजार ७९५ , रामदास तडस (भारतीय जनता पार्टी) एकूण मते ४ लाख ५१ हजार ४५८, अक्षय मेहरे भारतीय (अखील भारतीय परिवार पार्टी) एकूण मते ५ हजार ४६७, आशिष लेखीराम इझनकर (विदर्भ राज्य आघाडी) एकूण मते १ हजार ८२८, उमेश सोमाजी वावरे (महाराष्ट्र विकास आघाडी) एकूण मते १ हजार २४६, कृष्णा अन्नाजी कलोडे (हिंदराष्ट्र संघ) एकूण मते १ हजार ६१ , कृष्णा सुभाषराव फुलकरी (लोकस्वराज्य पार्टी) एकूण मते १ हजार ३४३, दिक्षीता आनंद ( देश जनहित पार्टी) एकूण मते ७३६ मारोती गुलाबराव उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) एकूण मते ४ हजार ६७२, डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) एकूण मते ७९७, प्रा. राजेंद्र गुलाबराव साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) एकूण मते १५ हजार ४९२, रामराव बाजीराव घोडसकर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) एकूण मते १ हजार ४३८, अनिल केशवरावजी घुशे (अपक्ष) एकूण मते १ हजार ९७१, अरविंद शामराव लिल्लोरे (अपक्ष) एकूण मते १ हजार ४७६, आसीफ (अपक्ष) एकूण मते १५ हजार १८२, किशोर बाबा पवार (अपक्ष) एकूण मते १२ हजार ९२०, जगदीश उद्धवराव वानखडे (अपक्ष) एकूण मते २ हजार ३४९, पुजा पंकज तडस (अपक्ष) एकूण मते २ हजार १३५, ॲड. भास्कर मारोतराव नेवारे (अपक्ष) एकूण मते ४ हजार ३२, रमेश सिन्हा (अपक्ष) एकूण मते ७९९, राहुल तु. भोयर (अपक्ष) एकूण मते ६८९, विजय ज्ञानेश्वरराव श्रीराव (अपक्ष) एकूण मते १ हजार ७३८ व सुहास विठ्ठलराव ठाकरे (अपक्ष) यांना एकूण ७ हजार ६४८ मते मिळाली. तसेच एकूण ४ हजार ६३४ मतदारांनी नोटाला मते दिली.

Devendra Fadnavis
“आम्हाला आमची मते मिळाली, पण महाविकास आघाडीची… ”; विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Anil Patil on Congress
“काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी…”, अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांचा मोठा दावा
Nana Patole
“लपवाछपवीची मॅच नाही, ७० दिवसानंतर खरी…”, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
Gondia Legislative Assembly,
गोंदिया विधानसभेवर विद्यमान अपक्ष आमदारासह यांचाही दावा
Chandrapur Political Preparations, Political Preparations Heat Up for Assembly Elections, assembly election of chandrapur, many office bearers Claims on constituencies in Chandrapur
चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडी, महायुतीत ‘उदंड जाहले इच्छुक’!
Wardha, victory, Lok Sabha,
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे प्राधान्यात बदल, आता ‘हा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर
Ajit Pawar VS Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाडांना अजित पवार गटाचं आव्हान; मुंब्रा-कळवा विधानसभेबाबत नजीब मुल्ला यांचं मोठं विधान
Nilesh Lanke
इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर निलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणुकीत माझ्यावर…”

हेही वाचा – विदर्भात काँग्रेसची मुसंडी, भाजपला फटका; मविआ’ला १० पैकी ७ जागांवर यश

हेही वाचा – बळवंत वानखडेंच्‍या विजयात ‘या’ मतदार संघाचा मोठा वाटा; अमरावती, तिवसा, दर्यापूर आणि अचलपूरमधून मताधिक्‍य

सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली. त्यानंतर नियमित मोजणीस आरंभ झाला. बसप उमेदवाराने वंचितपेक्षा अधिक मते घेत ताकद दाखवून दिली आहे. सर्व सहाही विधानसभा क्षेत्रात तुतारी वाजली. हे चिन्ह अगदी नवे म्हणून प्रारंभी काँग्रेस आघाडीचे नेते साशंक होते. पण मोदी विरोध हा एक कलमी कार्यक्रम हाती घेऊन विविध भाजपेतर पक्ष तसेच संविधान प्रेमी म्हटल्या जाणाऱ्या संघटनांनी भारत जोडो या नावाने एकत्र येत प्रचाराची धुरा हाती घेतली होती. त्यांनीच काळे यांच्या विजयाचा मार्ग सूकर केल्याचे आता म्हटल्या जात आहे. संयोजक अविनाश काकडे म्हणतात आमचे ध्येय पूर्ण झाले. योग्य उमेदवार द्या, बाकी आम्ही बघतो, असे आमचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगणे होते. तसेच झाले.