वर्धा : पोलिसांची तब्येत हा चिंतेचा विषय समजल्या जातो. चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस दादास मग स्वतःची तब्येत बाजूला सारून काम करावे लागते. आता त्यांचेपण आरोग्य चिंतेचा विषय समजून पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयासोबत सामंजस्य करार केला आहे.

राज्य शासनाने पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी वयोमर्यादा ठरविली आहे. मात्र सावंगी रुग्णालयात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करू, अशी हमी रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उदय मेघे यांनी दिली. पोलिसांच्या आरोग्याची लेखी नोंद करण्यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात येणार असल्याचे अधीक्षक हसन म्हणाले.

हेही वाचा – १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट आयटी कंपनीत नोकरी, वाचा काय आहे प्रकरण

हेही वाचा – नागपुरातही मराठा आरक्षण आंदोलन पेटले, गणेशपेठमध्ये टायर पेटवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आचार्य विनोबा भावे रुग्णालय व शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटर येथील वैद्यकीय सेवा पोलीस विभागास उपलब्ध करून देण्याबाबत मेघे विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर व पोलीस उपअधीक्षक मनोज वाडीले यांनी करारावर स्वाक्षरी केली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, वैद्यकिय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विठल शिंदे, डॉ. रुपाली नाईक यांची प्रमुख हजेरी होती.