scorecardresearch

नागपूर: अखेर ‘त्या’ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निलंबनाचे आदेश निघाले

वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याविरोधात कर्मचाऱ्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती. अखेर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर वनविभागाने कारवाई केली

नागपूर: अखेर ‘त्या’ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निलंबनाचे आदेश निघाले
नागपूर वनविभाग कार्यालय

महिला कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, कनिष्ठ सहकाऱ्यांना धमकावणे, सतत दहशतीचे वातावरण निर्माण करणे एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला चांगलेच भोवले. वरिष्ठांनी त्याला वाचवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, बेताल वागणुकीचा कहर झाल्याने शनिवारी त्याला निलंबित करण्यात आले.

हेही वाचा- चंद्रपूर: ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग यांची निवड

वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एम.पीम्. राठोड यांच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून कनिष्ठ सहकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. सातत्याने अपमान करणे, महिला सहकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलणे अशा अनेक तक्रारींचा पाढा वरिष्ठांसमोर मांडण्यात आला. तरीही त्याला वाचवण्याचे काम त्यांनी केले. मात्र, याचा कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याने कर्मचारी संघटनेने अखेर कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे शनिवारी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्र.ज. लोणकर यांनी राठोड यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 17:42 IST

संबंधित बातम्या