scorecardresearch

वाशीम: ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा स्वपक्षीय महिला नेत्यावर चाकू हल्ला; जिल्हा प्रमुखास अटक

रंजना पौळकर यांनी याआधीच जिल्हाप्रमुख सुरेश मापरी यांच्या निकवर्तीयांकडून त्यांच्या जिवाला धोका असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती.

वाशीम: ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा स्वपक्षीय महिला नेत्यावर चाकू हल्ला; जिल्हा प्रमुखास अटक
आरोपी सुरेश मापारी

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर झालेल्या चाकू हल्लाप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश मापारी यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- “महाराष्ट्राचे देव संपले का?” शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी…”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनियुक्त महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर चाकू हल्ला झाला होता. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर वाशीमच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला मदत करणाऱ्या अब्दुल जुबेर अब्दुल जब्बार, अब्दुल वाजीद या दोन आरोपीला अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, त्यांचे भाचे नितीन कावरखे, भगवान शंकर वाकुडकर यांचे नाव समोर आले होते. आज पोलिसांनी सुरेश मापारी यांना अटक केली.

हेही वाचा- गडकरी म्हणतात सध्या ऊसा सारखी फायद्याची शेती दुसरी नाही…

दरम्यान, रंजना पौळकर यांनी याआधीच जिल्हाप्रमुख सुरेश मापरी यांच्या निकवर्तीयांकडून त्यांच्या जिवाला धोका असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी अदखलपात्र तक्रार नोंदवून पौळकर यांची बोळवण केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 23:09 IST

संबंधित बातम्या