वाशीम : शिरपूर येथील जवान आकाश अढागळे यांना लेहमध्ये वीरमरण आले. कर्तव्यावर असताना उंच पहाडावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान १० सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. जवान आकाश अढागळे भारतीय सैन्यात बारा वर्षापूर्वी दाखल झाले होते. आकाश गरीब कुटुंबातील होते. मोठ्या कष्टातून ते भारतीय सैन्यात दाखल झाले. लेह येथे सेवा बजावत असताना उंच पहाडावरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा : ‘कॅन्सर’ झाला की नाही हे पहिल्याच टप्प्यात सांगणाऱ्या यंत्राचा शोध, वाचा कॅन्सरला कसे हरवता येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. १० सप्टेंबर रोजी त्यांना वीरमरण आले. काही वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आता घरातील तरुण मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ व चार वर्षाची मुलगी आहे. त्यांचे पार्थिव मंगळवारी शिरपूर येथे आणले जाईल, असे सांगितले जात आहे.