नागपूर : पंतप्रधान मोदींनी देशाला विकसित भारताची गॅरंटी  दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी जिथे यात्रा काढतील तिकडे त्यांना मोदी आणि भाजपचा जयघोष पाहायला आणि ऐकायला मिळेल, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नावाने सरकार येणार आहे. त्यामुळे सगळीकडे  त्यांचे नारे लागतील. मोदी यांचा विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर त्याला आम्ही सोबत घेऊ. भाजपचा दुपट्टा तयार आहे पण मला याबाबद्दल कुठलीही माहिती नाही, कुणी माझ्या संपर्कात नाही. आमचा पक्ष हा विचारावर चालणार पक्ष आहे असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – ‘या’ राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्याबाबत हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

हेही वाचा – शिक्षक भरती : दलाल, मध्यस्थ सक्रिय; ‘ही’ घ्या काळजी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींच्या विकसित भारताच्या स्वप्नासाठी जो सोबत येईल त्याला आम्ही सोबत घेऊ पण, विजय वडेट्टीवार हे आमच्या संपर्कात नाही. उद्या विशेष अधिवेशन आहे आणि मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देईल. पुन्हा मराठा समाजाला मनस्ताप होणार नाही आणि जी आंदोलने केली जात आहेत ते आंदोलन कमी होईल. अजून जागा वाटप व्हायचे आहे. त्याच्यामुळे कोण कुठून लढेल हे अजून ठरलेलं नाही. आशिष शेलार आणि राज ठाकरे भेट ही वैयक्तिक असू शकते. त्यावर मी काय बोलणार असे सांगत बावनकुळे यांनी या भेटीवर बोलण्यास नकार दिला.