नागपूर : हेल्मेट सक्ती विरोधात मी स्वत: आधी नागपुरात आंदोलन केले होते. मला वाटले नव्हते, नागपूरकर कधी सक्तीने हेल्मेट घालतील, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – नागपूरच्या अंजली,नीलिमाची दुबईत चमकदार कामगिरी, प्रौढांच्या जलतरण स्पर्धेत जिंकले…

हेही वाचा – नागपुरात दिवसभर उत्साह अन् रात्री निराशा; भारतीय संघाच्या विश्वचषक पराभवाने क्रिकेटप्रेमीचा हिरमोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील देवगिरी येथे पत्रकारांसाठीच्या स्नेहसम्मेलनात फडणवीस पुढे म्हणाले, नागपुरात पूर्वी दुचाकी चालवताना कुणीही हेल्मेट घालत नव्हते. सक्तीनंतर मी स्वत: रस्त्यावर उतरून हल्मेटविरोधात आंदोलन केले. यावेळी मला नागपूरकर कधीही हेल्मेट सक्तीने घालतील, असे वाटले नव्हते. परंतु कालांतराने शहरात सीसीटीव्ही लागले. या नवीन यंत्रणेमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकांना घरपोच चालान जाऊ लागले. त्यानंतर नागपूरकर कटाक्षाने आता हेल्मेट घालत आहे. सध्या पूणेहून जास्त नागपुरात नागरिक दुचाकी चालवताना हेल्मेट घालताना दिसतात. हे चांगले असून प्रत्येकाने हेल्मेट घालने त्याच्या जिवासाठीही उत्तम असल्याचेही फडणवीस म्हणाले.