लोकसत्ता टीम

नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या लेखाअनुदानात विदर्भात नवीन कोणताही प्रकल्पाची घोषणा झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून अजनी सॅटेलाईट स्टेशनसाठी ७.५ कोटी मिळाले आहे. अजनी रेल्वे स्थानकाला सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास केला जात आहे. आतापर्यंत ४५.३३ कोटींच्या खर्चाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा ७.५ कोटी दिले जाणार आहेत. येथे चार नवीन प्लॅटफॉर्म विकसित केले जाणार आहेत.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु
property developers Kalyan seized
कल्याणमधील २६ विकासकांच्या ११४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ८८ हजार ८७६ चौरस मीटरच्या मालमत्तांचा लिलाव

राज्यातील विविध प्रकल्प रुळावर आणण्यासाठी त्यांना निधीचे बळ देण्यात आले आहे. एकूण १३ हजार ५३९ कोटी रुपयांची तरतूद २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून यापैकी १० हजार ६०० कोटी रुपये मध्य रेल्वेच्या वाट्याला आले आहेत. तर उर्वरित निधी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबईतील प्रकल्प आणि अन्य विभागांसाठी प्रस्तावित आहेत.

आणखी वाचा-दिल्लीहून हैदराबादसाठी विमान उडाले, पण प्रवाशाला अपस्मारचा झटका आल्याने…

केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला पूर्णत: नव्या मार्गिकांच्या कामांसाठी एकूण १ हजार ६८५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, सर्वाधिक ६०० कोटी रुपयांची तरतूद वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ पुसद या २७० किलोमीटर मार्गिकेसाठी आहे. तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ मार्गिकेसाठीही २५० कोटी, सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर मार्गासाठी ११० कोटी आणि धुळे-नर्दाना मार्गिका, कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर आणि बारामती-लोणांद मार्गासाठी प्रत्येकी १०० कोटी रुपयांची, तर फलटण-पंढरपूर या १०५ किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामासाठीही २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-“बापुंचे वास्तव्य राहिलेला वर्धा मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडू नका हो…” काँग्रेसजनांचे पक्षाध्यक्षांना साकडे

राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अतिरिक्त मार्गिकांच्या कामांसाठी एकूण २ हजार ७०२ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. यापैकी कल्याण – कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी ९० कोटी, पुणे – मिरज – लोंडा दोन मार्गिकांसाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वर्धा – नागूपर तिसरा मार्ग, वर्धा – बल्लारशहा तिसरा मार्ग, इटारसी – नागपूर, दौंड – मनमाड दोन मार्गिका, वर्धा – नागपूर चौथी मार्गिका, मनमानड – जळगाव तिसरा आणि जळगाव – भुसावळ चौथ्या मार्गिकेच्या कामांसाठीही निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.