लोकसत्ता टीम

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आज गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता च्या सुमारास शहरातील शिंगाडा तलाव काठा जवळील रस्त्याने जात असताना अचानक स्कुटीला आग लागून गाडी जळून राख झाली असल्याची घटना घडली .

शास्त्री वार्ड तिरोडा निवासी सौ. नूतन सुकलाल बिसेन या जिल्हा परिषद शाळा विहिरीगाव येथे शिक्षिका असून त्या आपल्या पतीसोबत शाळेकडील शिंगाडा तलाव काठावरील रस्त्याने जात असताना स्कुटीतून अचानक धूर निघू लागला. दरम्यान त्यांनी वेळ न घालवता ती गाडी तिथेच सोडून ते बाजूला झाले. त्यांच्या डोळ्या देखत स्कूटी गाडीने पेट घेतला व पूर्ण जळून गाडीची राखरांगोळी झाली.

हेही वाचा… बुलढाणा : अतिवृष्टीचे तांडव, २१६ गावांना तडाखा, पाऊण लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण अचानक घडलेल्या या घटनेत वेळ प्रसंगी सूचकता दाखविल्यामुळे सुदैवाने पती पत्नी दोघेही सुखरूप वाचले. सकाळच्या सुमारास घडलेली ही घटनेची माहिती तिरोडा शहरात वाऱ्यासारखी पसरली असता पेट घेऊन राख रांगोळी झालेल्या स्कूटीला बघण्याकरिता घटना स्थळी लोकांनी गर्दी केली होती.