चंद्रपूर : सिंदेवाही वन परिक्षेत्रात येणाऱ्या खातगाव भेंडारा येथे माकडाची शिकार करताना डीपीवर चढलेल्या बिबट्याचा जिवंत वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली.

वन परिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सिंदेवाही पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद सुरपाम, डॉ. शालिनी लोंढे यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याची पाहणी करण्यात आली. वनविभागाने पंचनामा केला. मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सिंदेवाही तहसीलचे वन परिक्षेत्र अधिकारी विशाल साळकर, क्षेत्र सहाय्यक दीपक हटवार, वन कर्मचारी, विद्युत विभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा – विदर्भात डिसेंबर, जानेवारीमध्येच गारठा अधिक; प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

हेही वाचा – “…तर महाराष्ट्रातील अनेक नेते अडचणीत येतील”, एल्विश प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ दिवसांपूर्वी विजेच्या डीपीवर माकडाचा मृत्यू झाल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे. याची माहिती वीज विभागाला फोनवरून देण्यात आली. विद्युत विभागाने रिमोटने लाईन बंद केली. मात्र माकडाला तिथेच राहू दिले, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. वनविभागाकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.