चंद्रपूर : काश्मिरातील दहशतवाद, ईशान्य प्रदेशातील हिंसाचार आणि दंडकारण्यातील नक्षलवादाचे कंबरडे मोडण्यात केंद्रातील मोदी सरकारला यश आले आहे. आज नक्षलवादग्रस्त राज्यातील हिंसाचाराच्या घटना ७० टक्के कमी झाल्या आहेत. भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेची निर्मिती करून देशाच्या सुरक्षेबाबतही मोदी सरकार यशस्वी ठरल्याचा दावा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केला.

अहीर रविवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात ‘मोदी ॲट ९’ महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, आमदार संदीप धुर्वे, चंदनसिंग चंदेल, जि.प.च्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, माजी आमदार सुदर्शन निमकर, हरीश शर्मा, विजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी अहीर यांनी केंद्र सरकार अनेक विकासात्मक योजना राबवत असल्याचे सांगितले. मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : डागा रुग्णालयात वीज खंडित; उपचार थांबले!, रुग्णांचा जीव टांगणीला

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ असो की ‘एक भारत एक संविधान’ या तत्त्वानुसार काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो, मोदी सरकारने देशहित समोर ठेवून निर्णय घेतले. देश संरक्षणाच्या दृष्टीने अधिक मजबूत होत आहे. २०१० मध्ये काँग्रेसच्या काळात देशात २ हजार २१३ इतक्या नक्षलवादी घटना घडल्या होत्या, त्यात १००५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, मोदी सरकारच्या कार्यकाळात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये मोठी घट झाली असल्याचे अहिर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> जागतिक पर्यावरण दिन: ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या अंमलबजावणीतील त्रुटी उघड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रातील मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामांची माहिती अहीर यांनी सांगितली. मात्र, देशात वाढत असलेली प्रचंड महागाई, घरगुती गॅस व पेट्रोल दरवाढ यावर बोलण्याचे अहीर यांनी टाळले. १० कोटी रोजगाराबाबत प्रश्न विचारला असता, रोजगार म्हणजे केवळ नोकरी नव्हे, असे सांगून देशात मोठ्या प्रमाणावर रोजागर उपलब्ध करून दिले असल्याचे मोघम उत्तर त्यांनी दिले. चंद्रपूर महापालिकेत अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी मान्य केले.