Elephant Video: ओडिसा वरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेले रानटी हत्ती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात बुधवारला आढळून आले. रात्रीच्या सुमारास वैनगंगा नदी ओलांडून सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या गेवरा, डोंगरगाव, निफंद्रा, मेहा या गावातून जंगलामार्गे आले असून गुरुवार रात्रीच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात प्रवेश केला.

गुंजेवाही जंगलमार्गे कळमगाव गन्ना , कुकडहेटी गावपरिसरातून शुक्रवार सकाळच्या सुमारास प्रवेश करीत हत्तीने प्रवेश घेतल्याने दहशत निर्माण झाली आहे. कळमगाव गन्ना कुकडहेटी गावातून रानटी हत्तीने आगमन झाल्याने काही काळ कुतूहल वाटले असले तरी हत्तीने नागरिकांचा पाठलाग केल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

सिंदेवाही तालुक्यात दोन रानटी हत्तीच्या शिरकाव झाल्याने नागरिकात दहशत निर्माण झालेली दिसून येत आहे. सिंदेवाही तालुका हा जंगलव्याप्त भाग असल्याने अगोदरच जंगली हिंस्त्र प्राण्याची दहशत असतांना आता त्यात हत्तीची भर पडत आहे . त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. एकीकडे हिस्त्र जंगली प्राण्यांचा सामना नागरिकांना व शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तर दुसरीकडे नागरिक भयभीत असतांना रानटी हत्तीच्या प्रवेशाने भिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

लवकरात लवकर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे. सदर रानटी हत्ती शुक्रवार सकाळ साडेपाच वाजताच्या सुमारास कळमगाव गन्ना , कुकडहेटी गाव मार्गे शिवणी वनपरिक्षेत्रांतील कुकडहेटी बिटातील जंगलात प्रवेश केला असल्याची माहीती असून शिवणी वनविभागाची चमू हत्तीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिंदेवाही तालुक्यातील गाव परिसरात हत्ती दहशत निर्माण झाली असल्याने मानव व वन्यजिव संघर्ष शिगेला पोहचला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्तींचा व्हिडीओ (Elephants Video)

ओडिशावरून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप गेल्या तीन वर्षांपासून वनविभागासह गावाकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. यात पुन्हा दोन रानटी हत्तींची भर पडली असून आठवडाभरापूर्वी या दोन हत्तींनी छत्तीसगडहून गडचिरोलीच्या कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात प्रवेश केला होता. ११ मे रोजी सकाळच्या सुमारास या हत्तींनी मानापूर गावात धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांची भंबेरी उडाली होती. आता हे दोन रानटी हत्ती २५ मे रोजी मध्यरात्री थेट गडचिरोली शहरात आल्याने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली.