नागपूर : दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होते. तर, त्यानंतर त्याचा अहवाल २९ जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी प्रकाशित करण्याची परंपरा आहे. मात्र, जागतिक व्याघ्र शिखर परिषदेत या अहवालाचे प्रकाशन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवण्यासाठीच ही परंपरा खंडित करण्यात आल्याची चर्चा वन्यजीव अभ्यासकांच्या वर्तुळात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी वाघांच्या वाढत्या संख्येचे श्रेय अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधारेच ही चर्चा सुरू असून सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आयोजित जागतिक व्याघ्र शिखर परिषदेत करून वाघांच्या वाढत्या संख्येचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रातील सूत्रानुसार, २०२२च्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या साडेतीन ते चार हजापर्यंत वाढली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. २०१८ मध्ये ही संख्या २९६७ इतकी होती. जगभरातील व्याघ्रसंख्येच्या ७५ टक्के वाघ भारतात असून त्यात पुन्हा वाढ झाल्यामुळेच आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचा मुहूर्त टाळण्यात आला. रशियातील व्लादिवोस्तोक येथे सप्टेंबर महिन्यात दुसरी जागतिक व्याघ्र शिखर परिषद  होण्याची दाट शक्यता आहे. किंवा ऑक्टोबरमध्येही तमिळनाडूत ही परिषद होण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेत पुढील दशक किंवा त्याहून अधिक काळासाठी जागतिक व्याघ्र संवर्धनाची दिशा आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल.

More Stories onवाघTiger
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wildlife researcher remark over delay on tiger census zws
First published on: 02-08-2022 at 04:11 IST