अकोला : अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मंगळवारी (३१ मे) सकाळी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अनेक दिग्गजांचा प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना हादरा बसला. आता त्यांना पर्यायी प्रभागाचा शोध घ्यावा लागेल. आरक्षित जागेवर दमदार उमेदवारांचा शोध घेण्यात राजकीय पक्षांची देखील चांगलीच दमछाक होणार आहे.

अकोला महापालिकेत एकू़ण ९१ जागा असून एकूण ४६ जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर १५ जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव आहेत. ७४ जागा खुल्या प्रवर्गासाठी राहतील. अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकूण १५ प्रभागातील अनुसुचित उमेदवारांसाठी आज चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये आठ जागा अनुसूचित जाती महिला राखीव झाल्या. त्यात ३-अ, ६-अ, ९-अ, १०-अ, १२-अ, १८-अ, १९-अ आणि २३-अ या जागा आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी २४-अ जागा महिला राखीव करण्यात आली.

water Mumbai, water distribution,
‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ

सर्वसाधारण महिलांसाठी ३७ जागा राखीव झाल्या आहेत. त्यामध्ये ‘अ’ मध्ये १, ५, ७, ८, ११, १३, १५, १६, १७, २१, २२, २६, २८, तर ‘ब’ जागांसाठी २, ३, ४, ६, ९, १०, १२, १४, १८, १९, २०, २३, २४, २५, २७, २९, ३० या ३० जागा आरक्षित झाल्या. उर्वरित सात जागा ज्या प्रभागात दोन जागा अनारक्षित आहे, त्या प्रभागातून चिठ्ठया टाकून आरक्षित केल्या आहेत. यामध्ये १-ब, ५-ब, ८-ब, १५-ब, १७-ब, २६-ब, २८-ब या जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. महिला आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांकडून पत्नी किंवा आईला पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, महापौरांसह अनेक प्रस्थापितांच्या अडचणी

महापालिकेच्या एकूण ३० प्रभागातून ९१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. २९ प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. १५ प्रभागात तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. प्रभाग आरक्षित झाल्याने काही इच्छुकांची चांगलीच अडचण झाली आहे.