आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणावर बसलेल्या महिला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी हनुमान चालीसा म्हणायला निघाल्या असता त्यांना पोलिसांनी संविधान चौकात अडवले. वर्धा जिल्ह्यातील बचतगटचे काम करणारी ४२ प्रभाग संघ व्यवस्थापक महिला तब्बल ७ दिवसांपासून  नागपूरच्या संविधान चौक येथे उपोषणाला बसल्या आहेत.

हेही वाचा- पनवेल: नैना’विरोधात सूकापूरमध्ये उत्स्फुर्त बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री तथा वर्धाचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस न्याय देणार अशी त्याची अपेक्षा होती. परंतु फडणवीस यांनी त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी १३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता देवेंद्रजी फडणवीस यांच्या त्रिकोणी पार्क धरमपेठ या जनसंपर्क कार्यलयासमोर हनुमान चालीसा पठन करण्याकरता संविधान चौक येथून निघाल्या. त्यांना पोलिसांनी संविधान चौकात अडवले.