नागपूर : वाघाचे एकत्रित कुटुंब पाहायला मिळणे तसे दुर्मिळच. वाघिणीला बछडे झाल्यानंतर वाघ कधीच त्या बछड्यांच्या आणि वाघिणीच्या सोबत दिसून येत नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मात्र असे बरेच समज-गैरसमज मोडीत निघाले आहेत. पर्यटकांना ‘जुनाबाई’ वाघीण आणि ‘डागोबा’ हा वाघ त्यांच्या बछड्यांसह दिसून आले. वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी ही एकत्रित कुटुंबाची भटकंती कॅमेऱ्यात कैद केली.

माणसांमध्ये असलेली एकत्र कुटुंबपद्धती सहसा वाघांच्या कुटुंबामध्ये दिसून येत नाही. उलट वाघिणीला बछडे झाल्यानंतर वाघ त्यांच्याकडे ढुंकुनही पाहात नाही. त्यामुळे ते बछडे मोठे होईपर्यंत म्हणजेच दोन वर्षाचे होईपर्यंत त्यांना खाऊ घालण्यापासून तर शिकार कशी करायची हे शिकवण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी या वाघिणीचे असते. ताडोबाच्या जंगलात याची प्रचिती येते. बछडे वाघासोबत नाही तर वाघिणीसोबतच फिरताना हमखास त्यांचे दर्शन होते.

व्हिडीओ सौजन्य- इंद्रजित मडावी

हेही वाचा >>> जागतिक व्याघ्र दिनी वाघीण मृतावस्थेत आढळली; वनखात्यात खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपवादात्मक परिस्थितीतच वाघ बछड्यांसोबत दिसतो. याच व्याघ्रप्रकल्पाने वाघांच्या बाबतीत असलेले अनेक समजगैरसमज उलटवून लावले आहेत. वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांना काही महिन्यांपूर्वी ‘डागोबा’ या नावाने ओळखला जाणारा वाघ, ‘जुनाबाई’ नावाने ओळखली जाणारी ही वाघीण आणि त्यांचे बछडे एकत्रितपणे फिरताना आणि नंतर पाणवठ्यावर आढळून आले. अशावेळी हा दुर्मिळ क्षण त्यांनी कॅमेऱ्यात कैद नाही केला तर नवलच!