scorecardresearch

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ही धक्कादायक घटना खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून पीडित मुलीला गर्भधारणा झाली. ही धक्कादायक घटना खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> अकोला : अल्पवयीन मुलाकडून व्यसनाधीन वडिलांची हत्या

अविनाश जगेश्वर राऊत (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीची एक वर्षापूर्वी अविनाशसोबत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर संवाद सुरू झाला. या काळात एक दिवस पीडित मुलीची आई शेतात गेल्यावर ती घरी एकटीच होती. यावेळी अविनाश तिच्या घरी गेला. पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्यातून पीडित मुलीला गर्भधारणा झाली. दरम्यान, पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने तिने याबाबत आईला सांगितले.

हेही वाचा >>> अमरावती : पैशांसाठी गरीब मुलींना विकणारी टोळी गजाआड

आईने तिला डॉक्टरांना दाखवले. तपासणीनंतर डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे आईला सांगितले. त्यामुळे आईने तिची विचारपूस केली. यावेळी तिने सर्वकाही सांगितले. त्यानंतर आईने तिला रुग्णालयात दाखल केले. पीडित अल्पवयीन असल्याने रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीचे बयाण नोंदवले. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 09:28 IST
ताज्या बातम्या