नागपूर : कुख्यात गुन्हेगार युवकाने गांजा पिण्यावरून वाद झाल्यामुळे मित्राचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजता टेकडी वाडीत घडली. लक्की ऊर्फ लिखित घनश्याम आडे (२८,साईनगर, दाभा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून सागर घोष (३०) असे आरोपीचे नाव आहे.

लक्की आडे याच्या वडिलांचा जेसीबी आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. लक्कीसुद्धा वडिलांना व्यवसायात मदत करतो. मंगळवारी दुपारी तीन वाजता लक्की हा टेकडी वाडीतील मित्र विक्की लोखंडेच्या घरी दारु आणि गांजा पित बसले होता. काही वेळात आरोपी सागर घोष तेथे आला. तोसुद्धा तेथे दारू पित बसला. दरम्यान, लक्की आणि सागरमध्ये वाद झाला. सागरने पाठीमागे लपवलेला चाकू काढला आणि लक्कीच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात लक्कीचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर सागर हा फरार झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. सागरच्या वडिलांनी मुलाला वाडी पोलीस ठाण्यात नेऊन आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

हेही वाचा – ५४ वर्षांनंतर कॉंग्रेसकडून चंद्रपूरमध्ये महिला उमेदवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दारुड्या पित्याककडून मुलाचा खून

दारुड्या पित्याने २८ वर्षीय मुलाच्या डोक्यात शेतीचे अवजार मारून खून केला. ही थरारक घटना धुळवळीच्या दिवशी उमरेडमध्ये घडली. सूरज काकडे असे खून झालेल्या मुलाचे तर रामराव काकडे असे आरोपी वडिलाचे नाव आहे. रामराम काकडे याला दारूचे व्यसन आहे. तो सोमवारी दुपारी तीन वाजता दारू पिऊन घरी आला. घरात मोठमोठ्याने फोनवर बोलत होता. सूरजने वडिलांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यावरून रागाच्या भरात शेतीचे अवजार सूरजच्या डोक्यावर मारले. या हल्ल्यात सूरजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.