नागपूर : एका हॉटेलचा कुक विधवेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होता. मात्र, त्या महिलेच्या घरी गावातील एक तरुण वारंवार येत असल्यामुळे अनैतिक संबंधाचा संशय होता. त्याच संशयातून कुकने त्या युवकाच्या छातीत चाकू भोसकून खून केला. मंगेश अशोकराव गायकवाड (३२, पारडसिंगा) असे मृत युवकाचे नाव आहे.

आरोपी ज्ञानेश्वर वानखडे (४०, पारडसिंगा) हा गावाजवळील लोकशाही ढाब्यावर कुक म्हणून काम करतो. त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. गावातच एक विधवा ५ वर्षांच्या मुलीसह राहत होती. तिच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. ज्ञानेश्वर आणि विधवेचे सूत जुळले. दोघांनीही एकमेकांना साथ देण्याचे ठरविले. त्यामुळे ज्ञानेश्वर त्या महिलेच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्या महिलेनेही पतीच्या निधनानंतर आधार म्हणून ज्ञानेश्वरशी घरोबा केला होता. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. संत्री तोडण्याचा ठेका घेणारा मंगेश गायकवाड याच्याशी त्या महिलेची ओळख झाली. त्याच्याकडे ती कामाला जायला लागली. त्यामुळे मंगेश वारंवार तिच्या घरी यायला लागला. त्यामुळे ज्ञानेश्वरला ती बाब खटकत होती.

हेही वाचा – चंद्रपूर : राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वेतनापासून वंचित, ७९ महिन्यांपासून पगार नाही

हेही वाचा – राज्यासह देशात १२ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्ञानेश्वर हॉटेलमध्ये गेल्यानंतर मंगेश त्या महिलेला दुचाकीने शेतात नेत होता. दोघांचे चांगले संबंध निर्माण झाले. दरम्यान, ज्ञानेश्वरने प्रेयसीची समजूत घालून मंगेशचा नाद सोडण्यास सांगितले. मात्र, तिने प्रेमसंबंध नसून फक्त मैत्री असल्याचे सांगितले. शनिवारी रात्री नऊ वाजता ज्ञानेश्वर हॉटेलमधून घरी आला. त्यावेळी मंगेश हा त्याला घरात आढळून आला. त्यामुळे चिडलेल्या ज्ञानेश्वरने मंगेशवर चाकूने हल्ला केला. दरम्यान, चरणदास तागडे हा मंगेशला वाचविण्यासाठी धावला. ज्ञानेश्वरने चरणदासवरही चाकूने हल्ला करून जखमी केले. तर मंगेशच्या छातीत चाकू भोसकून खून केला. या प्रकरणी काटोल पोलीस ठाण्याचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी गुन्हा दाखल करून आरोपी ज्ञानेश्वरला अटक केली.