News Flash

नाशिकमध्ये तरूणावर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्राने कापला कान

दहा ते पंधरा जणांच्या गर्दीतून एक अज्ञात युवक पुढे आला.

Deadly attack on youth in Nashik : या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंगापूर रोड परिसरातील संत कबीर नगर येथे चर्चच्या समोर मित्रांसोबत जात असणाऱ्या २५ वर्षीय तरुणावर एका अज्ञात संशयिताने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी हल्लेखोराने त्याच्याजवळील धारदार शस्त्राद्वारे तरूणाचा कान कापत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञात संशयिताविरूध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूरमधील गणेशनगर परिसरातील अमोल अपार्टमेंट येथे मिखिल कनवर हा मित्र अनिकेत पाटीलसह कामानिमित्त शहरात आला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मिखिल अनिकेतसह दुचाकीवरून सातपूरमधील आपल्या घराकडे जात होता. पहाटे पावणेतीनच्या सुमारास संत कबीरनगर परिसरात आले असता दहा ते पंधरा जणांच्या गर्दीतून एक अज्ञात युवक पुढे आला. त्याने मिखीलची गाडी अडवून त्याला बाजुला होण्यास सांगितले. कुठलाही वाद व पूर्ववैमनस्य नसताना त्या संशयित युवकाने अनिकेतच्या कानावर शस्त्राने वार केले. त्याला गंभीर जखमी करून संशयित घटना स्थळावरून पळून गेला. श्रीगुरूजी रुग्णालयात अनिकेतवर उपचार सुरू असून पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अज्ञात संशयिताविरूध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 11:14 pm

Web Title: deadly attack on youth in nashik attacker cut ear by sharp weapon
Next Stories
1 शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे आज लोकार्पण
2 पालिकेसाठी काँग्रेसचे राष्ट्रवादीशी आघाडीचे संकेत
3 बेशिस्त चारचाकी वाहनधारकांना केवळ २५० रुपये दंड
Just Now!
X