पोलीस ठाणे, न्यायालयात पाच हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित

ग्रामीण भागात शेती, सामायिक बांध तसेच किरकोळ वादावर नियंत्रण मिळवून गाव परिसरात शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या अंतर्गत जिल्ह्य़ात २६ तंटामुक्त समित्या सक्रिय झाल्या आहेत. असे असतानाही वर्षांकाठी पोलीस ठाणे, न्यायालयात दाखल मारामारीची प्रकरणे पाच हजाराहून अधिक आहेत. हे चित्र पाहता सद्यस्थितीत या योजनेचा बोजवारा उडाला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
atul londhe
 ‘नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा’; पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व निवडणुक आयोगाला पत्र
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

गृह विभागाने साधारणत: आठ वर्षांपूर्वी गावपातळीवर आपआपसातील वाद सामोपचाराने मिटावेत व गावांत शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. जिल्ह्य़ाचा विचार केला तर १५ तालुक्यांत ४० पोलीस ठाणे असून एक हजार ३८७ ग्रामपंचायतीवर २६ तंटामुक्ती समिती नियंत्रण ठेवून आहे. या समित्यांमध्ये गावातील प्रतिष्ठित मंडळी, पोलीसपाटील, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. गाव पातळीवर प्रत्येक पोलीस ठाण्यात या संदर्भातील तंटय़ाचा निपटारा करण्यासाठी एक दिवस राखीव ठेवत हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. मात्र समित्या प्रभावीपणे काम करत नसल्याचे चित्र आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी गाव पातळीवर अनेक समित्या सध्या सक्रिय नसल्याची तक्रार केली आहे. सदस्यांना समितीमध्ये आपले नाव आहे की नाही, याची माहिती नाही. या स्थितीत ते काम कसे करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुरगाणा येथे गाव पातळीवर समितीची कोणतीही बैठक झाली नाही किंवा अशी काही समिती असते हे ग्रामस्थांना माहीत नसल्याचे हिरामण चौधरी यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात मागील १० वर्षांत समितीची बैठक झाली नसल्याचे कमलाकर नाथे यांनी सांगितले.

पोलिसांची आकडेवारी

जिल्ह्य़ातील १५ तालुक्यात ४० पोलीस ठाणी असून या अंतर्गत एक हजार ३८७ ग्रामपंचायती येतात. गावातील वाद मिटवण्यासाठी पोलीस अधिकारी, गावातील काही मंडळी, पोलीस पाटील यांची संयुक्त तंटामुक्ती समिती गठित करण्यात आली आहे. मागील वर्षी गांव पातळ्यांवर वेगवेगळ्या कारणातून दिवाणी न्यायालयात १८२, महसूल संदर्भात २५, फौजदारी स्वरूपाच्या १०,५४३ अशा एकूण १० हजार ७५० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी पाच हजार ११६ तक्रारींचा निपटारा तंटामुक्त समितीचे माध्यमातून करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोहिमेत सहभाग नसेल, तर तक्रारी कशा येणार?

महात्मा गांधी तंटामुक्ती योजना ही एक मोहीम आहे. या मोहिमेत गावाला भाग घ्यावा लागतो. १५ ऑगस्टच्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभेत गावकरी मोहिमेत सहभागी होण्याचा ठराव मांडतात. या ठरावानंतर समित्या गठित होतात. प्रत्यक्ष कामास सुरुवात होते. सुरुवातीच्या टप्प्यात बहुतांश गावांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पण नंतरच्या काळात ही संख्या कमी होत गेली. मोहिमेत सहभाग नसेल तर तक्रारी येणार कशा?

संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण