लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: दिल्ली येथील भाविक तरुण गर्ग व ज्योती गर्ग परिवाराने श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट अंतर्गत कार्यान्वित केलेले श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ११ लक्ष रुपयांचे दान देत अनोखे दातृत्व दर्शविले आहे.

श्री साईबाबांचे भक्त असलेले गर्ग कुटुंबीय हे काही दिवसांपूर्वी श्री भगवती दर्शनासाठी आले असता विश्वस्त ॲड. दिपक पाटोदकर यांनी त्यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कार्य व भाविकांच्या सेवा सुविधांची प्राथमिक माहिती दिली प्रसंगी त्यांनी श्री भगवती सेवेत काहीतरी योगदान देणे बाबत इच्छा व्यक्त केली असता त्यांच्याशी आवश्यक तो समन्वय करण्यात आला.

हेही वाचा… समृद्धी महामार्गासाठी स्फोटकांचा वापर; इगतपुरी तालुक्यात कामालगतच्या घरांना तडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी सहकुटुंबाने श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे भेट देऊन श्री भगवती आरती करून रु. ११ लक्ष रकमेचा धनाकर्ष हा विश्वस्थ पाटोदकर यांसकडे पूर्व संकल्पनेच्या संदर्भासह सुपूर्त केला. प्रसंगी त्यांना भक्तनिवास, प्रसादालाय तसेच इतर अनुषंगिक सेवा-सुविधेची माहिती दिली असता त्यांनी भक्तनिवास व प्रसादलयातील अद्यावत तंत्रज्ञान आधारित प्रक्रिया व सेवा सुविधेसह संस्थेच्या व्यवस्थापन व प्रशासन कामकाज तसेच समन्वयाचे विशेष कौतुक करून भविष्याकाळात श्री सेवेत तांत्रिक व यांत्रिकीकरण आधारित विशेष यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्याची इच्छा दर्शविली. यावेळी विश्वस्त उपस्थित होते.