लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी सकाळी दरोडा टाकून सुमारे १५ लाखांच्या रोकडसह लाखोंचे सोने लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयानजीकच्या स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी सकाळी नऊला बँक उघडून नियमितपणे कारभार सुरू झाला. कर्मचारी कामात गुंग असताना दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या धाकाने दोन्ही युवकांनी व्यवस्थापक राहुल महाजन यांच्यासह पाच-सहा कर्मचार्‍यांना धमकावले. त्यांनी व्यवस्थापक महाजन यांच्या मांडीवर कोयत्याने वारही केले. काही कळण्याच्या आतच दरोडेखोरांनी बँकेतील सुमारे १५ लाखांची रोकड व लाखोंचे सोने बॅगमध्ये भरून काही क्षणात पलायन केल्याचे सांगण्यात आले. अवघ्या काही मिनिटे हा थरार सुरू होता. सकाळच्या वेळी फारशी ग्राहकांची वर्दळ नसल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून दरोडा फत्ते केला.

हेही वाचा… घराची मंजुरी आणण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच; ग्रामसेवक जाळ्यात

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शंकर शेळके आदींसह पोलीस पथकाने धाव घेत माहिती जाऊन घेतली. श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. जखमी व्यवस्थापक महाजन यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून, जिल्हाभरातील यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.