लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: दीपावलीच्या पार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अन्नपदार्थांची तपासणी करण्यात येत असून शहरातील दोन ठिकाणी भेसळीच्या संशयाने ८४, ११० रुपयांचा ३९७ किलो पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा-नाशिक: क्रेडिट कार्ड कार्यान्वित करण्याच्या नावाखाली फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्रिमूर्ती चौकातील मे. विराज एंटरप्रायजेस पेढीची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. पनीरमध्ये खाद्यतेलाची भेसळ केल्याच्या संशयावरून अन्नाचे नमुने घेत उर्वरीत १६,२८० रुपयांचा ७४ किलो साठा जप्त करण्यात आला. तसेच, उपेंद्र नगरातील साईग्राम कॉलनीत मे. साई एंटरप्रायजेस या पेढीची तपासणी करून पनीरचा नमुना ताब्यात घेण्यात आला. उर्वरीत ६७,८३० रुपयांचा ३२३ किलो पनीरचा साठा जप्त करण्यात आला. अन्नाचे नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठवण्यात आले आहेत. नागरिकांनी दुधापासून बनवलेले पदार्थ विकत घेतांना आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.