जळगाव: महावितरणच्या कामगार संघटनांच्या कृती समितीतर्फे खासगीकरणाविरोधात मंगळवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील अभियंत्यांपासून लाइनमनपर्यंत सुमारे दोन हजार आठशे कर्मचारी सहभागी झाले असून, आता जिल्हाभरात खासगी ठेकेदारांच्या ८२९ कामगारांवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आहे. तसेच अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरणतर्फे चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवला जाणार आहे.

हेही वाचा >>> MSEB Employee Strike: उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात संपाला सर्वाधिक प्रतिसाद, तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

 खासगी भांडवलदारांना देण्याचे धोरण रद्द करावे, तसेच समांतर वीज वितरण परवाना देण्यास सरकारच्या निर्णयाला विरोध यांसह इतर मागण्यांसाठी महावितरणच्या राज्यातील विविध तीसहून अधिक कामगार संघटनांनी  संप सुरू केला आहे. महावितरणच्या विविध कामगार संघटनांच्या कर्मचारी व अधिकारी मिळून दोन हजार आठशेहून अधिक कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतला आहे. संपामुळे वीजपुरवठ्याची यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जळगावकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> अखेर अंधार दाटलाच!, उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित

संपात बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम, महाराष्ट्ार राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, सब-ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, कामगार संघ, तांत्रिक संघटना, स्वतंत्र बहुजन संघटना, ऑपरेटर संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल वर्कर्स या संघटनांचे कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत.

हेही वाचा >>> नागपूर: महानिर्मितीकडून ६,१०० मेगावॅट उत्पादन, राज्यातील सकाळी ९ वाजताची स्थिती

संपाच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणने निवृत्त अभियंत्यांसह कर्मचारी, खासगी मक्तेदार व विविध एजन्सीचे कर्मचारी, इतर बाहेरील कर्मचार्‍यांमार्फत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तेथील अभियंत्यांमार्फत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. ग्राहकांना या आपत्कालीन परिस्थितीतही वीजपुरवठा सुरळीत देण्याबाबत यंत्रणा सज्ज ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे महावितरणचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी सांगितले.