रात्रपाळीतील ७५ टक्केहून अधिक कर्मचारी संपावर

महेश बोकडे

नागपूर: वीज यंत्रणेच्या खासगीकरणाला विरोधसह इतर मागणीसाठी राज्यातील तिन्ही शासकीय कंपनीचे वीज कर्मचारी ३ जानेवारीच्या मंध्यरात्रीपासून संपावर आहे. महानिर्मितीच्या राज्यभरातील वीज निर्मिती प्रकल्पात रात्रपाळीत ७५ टक्केहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यानंतरही ६,१०० मेगावॅट वीज निर्मिती ४ जानेवारीच्या सकाळी ९ वाजता नोंदवल्यागेल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पण येथे तांत्रिक दोष उद्भवल्यास स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.

Mahanirmiti, Power crisis, maharashtra,
राज्यावर वीजसंकटाचे सावट! महानिर्मितीकडे १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा
crisis on sugar industry 3000 crore hit due to restrictions on ethanol production
साखर उद्योगावर संकट; इथेनॉलनिर्मितीवरील निर्बंधांमुळे तीन हजार कोटींचा फटका
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
Navi Mumbai
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

MSEB Employee Strike : “आपल्याला महावितरणसारख्या कंपनीची गरजही लागणार नाही, कारण…”, MSEB च्या संचालकांचं मोठं विधान

राज्यात ४ जानेवारी सकाळी ९ वाजता विजेची मागणी २३ हजार २८० मेगावॅट होती. तर राज्यातील विविध वीज निर्मिती प्रकल्पात १४ हजार ७०० मेगावॅट वीज निर्मिती होत होती. त्यात महानिर्मितीच्या ६ हजार १०० मेगावॅट वीज निर्मितीचा समावेश होता. दरम्यान महानिर्मितीच्या एकूण वीज निर्मितीपैकी कोरडी प्रकल्पात १ हजार १३० मेगावॅट, खापरखेडा ४९६ मेगावॅट, पारस १८१ मेगावॅट, चंद्रपूर १ हजार ३७० मेगावॅट, भुसावळ ८०२ मेगावॅट, नाशिक २४४ मेगावॅट, परळी २६९ मेगावॅट आणि उर्वरित केंद्राच्या वाट्यासह उरण व कोयना या प्रकल्पातून निर्माण होत होती.

MSEB Employee Strike: उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात संपाला सर्वाधिक प्रतिसाद, तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर

महानिर्मितीच्या तीन प्रकल्पात रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांची स्थिती (ए शिफ्ट)

चंद्रपूर – २८२ पैकी १८० गैरहजर (६४ %)

कोराडी – ६२ पैकी ४६ गैरहजर (७४%)

खापरखेडा – १६१ पैकी १२४  गैरहजर (७७%)