नाशिक: राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय सूचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुभाष देशमुख, विधानसभा सदस्य रईस शेख, अनिल बाबर यांच्यासह विधान परिषद सदस्य प्रविण दटके हे सदस्य आहेत.

हेही वाचा… शक्ती कायद्याला केंद्र सरकारचा खोडा, दीपिका चव्हाण यांची तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत. यंत्रमागबहुल भागातील समस्यांबाबत यंत्रमागधारकांच्या विविध संघटनांशी चर्चा करणे, राज्यातील यंत्रमागबहुल भागातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना शासनास सादर करणे. वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेंतर्गत यंत्रमाग धारकांना ऑनलाईन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरणाचे उपाय, यंत्रमाग घटकासाठी अल्पकालीन उपाययोजना व शासनाच्या यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदल प्रस्तावित करणे अशी समितीची कार्यकक्षा असणार आहे.