नाशिक: सातपूर आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या गिते स्क्वेअर इमारत परिसरात बुधवारी पहाटे सव्वाचार वाजता लागलेल्या आगीत सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.

गिते स्क्वेअर इमारतीत वेगवेगळी कार्यालये आहेत. बुधवारी पहाटे अचानक आग लागली. याबाबत सातपूर अग्निशमन केंद्राला कळविण्यात आल्यावर बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीची तीव्रता पाहता सिडको तसेच मुख्य अग्निशमन केंद्रातून एकूण पाच बंब दाखल झाले. इमारतीला लागलेल्या आगीत लाकडी सामान, संगणक, लॅपटॉप, छपाई यंत्र, कागदपत्रे भक्ष्यस्थानी पडले. पाच बंबांच्या सहाय्याने १५ कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

हेही वाचा… धुळे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी संदीप बैरागी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आगीचे कारण अज्ञात आहे. आग नियंत्रणात येण्यासाठी दोन तासाहून अधिक कालावधी लागला. आगीत ३० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे प्रदीप परदेशी यांनी सांगितले.