नाशिक – हवाई दलाच्या ओझरस्थित ११ व्या देखभाल-दुरुस्ती केंद्रास अलीकडेच मिळालेला ‘प्रेसिडेंट कलर्स’ आणि २०२३ या वर्षात देखभाल-दुरुस्ती कमांड अंतर्गत सर्वोत्कृष्ट दुरुस्ती केंद्राचा सन्मान याबद्दल हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी केंद्रास भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

भारतीय हवाई दलाचे प्रमुख चौधरी हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी हवाई दलाच्या ओझरस्थित ११ व्या देखभाल-दुरुस्ती केंद्रास भेट दिली. या केंद्राचा इतिहास आणि कामगिरी यांचा वेध घेणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी चौधरी यांनी केली. केंद्रातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. देशभरातील सर्व केंद्रात ओझरचे केंद्र अव्वल ठरले. हवाई दल प्रमुखांचे स्वागत एयर मार्शल विभास पाण्डेय, केंद्राचे प्रमुख एअर कमोडोर आशुतोष वैदय यांनी केले. हवाई दल परिवार कल्याण संघटनेच्या अध्यक्षा नीता चौधरी यांनी केंद्रात राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची पाहणी केली. भेटीदरम्यान केंद्रातील महिलांशी त्यांनी संवाद साधला.

हेही वाचा – नंदुरबार : वादग्रस्त पोलीस निरीक्षकाविरोधात जमाव संतप्त, कारण…

हेही वाचा – कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्राचा नावलौकिक

देशातील देखभाल दुरुस्ती केंद्रांत ओझरस्थित ११ वे हे महत्वाचे केंद्र आहे. १९७५ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रात आजवर रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्तीसह सुखोईच्या संपूर्ण देखभाल दुरुस्तीची व्यवस्था करण्यात आली. मिग २९ लढाऊ विमानाच्या नुतनीकरणाचे काम करण्यात आले. त्या अंतर्गत क्षेपणास्त्र वाहून नेण्याची अधिक क्षमता, इंधन टाकीची क्षमता वृद्धिंगत करताना हवेत इंधन भरण्याची खास व्यवस्थाही करण्यात आली आहे.