नाशिक: धनुष्यबाण चिन्हाविषयीची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करते की काय, असा जनतेच्या मनात संशय निर्माण होत असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> जिल्ह्यात गोवर नियंत्रणासाठी विशेष लसीकरण मोहीम;  मालेगावकडे विशेष लक्ष

सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले असता दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अविरत काम करत असून जनतेचे बळ त्यांच्यामागे असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व यंत्रणा केंद्र आणि राज्य सरकारच्या, भाजपच्या बटीक असल्यासारख्या वाटत आहेत. संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्याविरुध्द झालेली कारवाई म्हणजे किती पध्दतीने माणसांना त्रास द्यायचा, सत्तेचा गैरवापर करायचा याचे उदाहरण आहे. सध्या सर्वांचा स्तर घसरत आहे. भीक मागणे म्हणणे जसे चुकीचे तसेच शाई फेकणेही चुकीचे आहे. एका पत्रकारावर गुन्हा दाखल होत आहे. पत्रकारिता करणाऱ्यांनी याची दखल घेण्याची गरज आहे. समृध्दी महामार्गसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोंदीनी कौतुक केले. परंतु, गद्दार आणि गद्दारांचे कौतुक करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.