नाशिक : म्हाडाच्या घरांवर आकारण्यात आलेल्या भुई भाडेवाढीबाबत लवकरच म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन समाधानकारक निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत कुणाचीही अडवणूक केली जाणार नाही.असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिल्याने नागरिकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

सातपूर परिसरात विविध उत्पन्न गटातील म्हाडाची जवळपास तीन हजार घरे आहेत. ३० ते ४० वर्षांपासून म्हाडा भुईभाडे वसूल करीत आहे. पूर्वी २०० ते ५०० रुपये असणारे भुई भाडे जुलै महिन्यापासून अचानक १० हजार ते १५ हजारापर्यंत वाढविण्यात आले. १०० पटीपेक्षा अधिक अन्यायकारक वाढ करण्यात आली आहे. तसेच पुढील ३० वर्षांचे भुईभाडे म्हणून जवळपास साडे चार लाख रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. ही अन्यायकारक भुईभाडे वाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी, यासाठी म्हाडाचे मुख्याधिकारी त्र्यंबक कासार यांना निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यात दीड हजारपेक्षा अधिक अतितीव्र कुपोषित बालके

म्हाडाच्या घरांवर आकारण्यात आलेली अन्यायकारक भुई-भाडे वाढ रद्द करावी, या मागणीसाठी आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे, सचिव प्रकाश महाजन, समतानगर हौसिंग सोसायटीचे नितीन विसपुते तसेच संजय राऊत, गौरव बोडके आदी नागरिकांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेत सविस्तर चर्चा केली. दरवाढ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या संदर्भात म्हाडाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन समाधानकारक निर्णय घेण्याचे आश्वासन सावे यांनी दिले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: “सत्तेची हाव नाही तर शपथ का घेतली?” संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल; यासह महत्त्वाच्या घडामोडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी नगररचना विभागाच्या प्रतिभा भदाणे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयस्वाल, उपसचिव कवडे, अवर सचिव केंद्रे, अप्पर मुख्य सचिव गृह निर्माण वलसा नायर आदी उपस्थित होते. म्हाडाने राबविलेल्या योजना गोरगरीब व सामान्य जनतेसाठी आहेत. शासन ठरावामुळे म्हाडाकडून आकारल्या जाणाऱ्या भुईभाड्यात १०० पट वाढ झाली आहे. एकाच ठिकाणी असलेल्या योजनांमधील भुईभाड्याच्या रकमेत तफावत आहे. सातपूर प्रभागात संपूर्ण गरीब कामगार वस्ती आहे. ही रक्कम ते कोणत्याही स्थितीत भरू शकणार नाहीत. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये. म्हाडाच्या वसाहतीतील रहिवाश्यांना फ्री होल्ड होण्यासाठी योग्य ते आदेश निर्गमित करावे, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी गृहनिर्माण मंत्र्यांकडे केली.