बाली (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियाई यूथ ब्लिट्झ (अतिजलद) बुध्दिबळ स्पर्धेत जळगावची भाग्यश्री पाटील हिने विजेतेपद मिळविले.
या स्पर्धा ब्लिट्झ (अतिजलद) स्वीस लीग पद्धतीने घेण्यात आल्या. त्यात इंडियन ऑइलची भाग्यश्री पाटील हिने सात फेर्‍यांअखेर सहा विजय आणि एक पराभव, असे सहा गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. याअगोदरही रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम आणि क्लासिक स्पर्धेत पाचवा क्रमांक तिने मिळविला. असे भारताला दोन सुवर्णपदके मिळवून देण्याची कामगिरी केली.

हेही वाचा >>>T20 World Cup 2022 : ‘जर थोडीशीही लाज असेल तर रमीझ राजा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’; पराभवानंतर माजी खेळाडूची मागणी

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

भाग्यश्रीने गुयेन थी खंड व्हॅन (व्हिएतनाम), बल्बयेवा शेनिया (कझाकस्तान), रिंधिया व्ही. (भारत), वू बुई थी थान वान (व्हिएतनाम), वुओंग की अंह (व्हिएतनाम), कलिउविआन सिसिलिया नातलिए (इंडोनेशिया) यांना पराभूत केले. तर सुल्तानबेक झिनीप (कजाकिस्तान) हिच्याकडून भाग्यश्री पराभूत झाली. स्पर्धेत आठ देशांचा सहभाग होता. एकूण २१ स्पर्धक सहभागी झाले होते. एक ऑक्टोबर २०२२ पासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने भाग्यश्री पाटीलला शिष्यवृत्ती देऊन सन्मानित केले असून, ती आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची खेळाडू झाली आहे, असे प्रवीण पाटील यांनी कळविले आहे.