लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, शिक्षक भास्कर भगरे कुटुंबियांकडे सुमारे पावणेदोन कोटींची मालमत्ता आहे. यामध्ये सुमारे ८० लाखाची चल संपत्ती असून ९३ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. या कुटुंबाकडे १७ तोळे म्हणजे १७० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.

दिंडोरी अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भगरे यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या शपथपत्रास संपत्तीचे विवरण जोडण्यात आले आहे. त्यानुसार भगरे यांच्याकडे चार तर, पत्नीकडे १३ तोळे सोने असे एकूण १३ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. भगरे यांच्याकडे एकूण ४३ लाख ७७ हजारांची तर पत्नीकडे ३७ लाख ९१ हजाराची चल संपत्ती आहे.

आणखी वाचा-नाशिक : राजाभाऊ वाजेंच्या संपत्तीत पाच वर्षात पाच कोटींनी वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अडीच कोटी रुपये रोख असलेल्या भगरे यांच्याकडे तीन गाड्या तर पत्नीकडे दोन गाड्या आहेत. भगरे यांच्या बँकेत १० लाख ३८ हजारांच्या ठेवी असून, शिक्षक पतसंस्थेतही त्यांनी सात लाखांची गुंतवणूक केली आहे. या कुटुंबाकडील शेतजमीन, नाशिकमधील सदनिका, विविध ठिकाणी बख्खळ जागा आदींचे सध्याचे बाजार मूल्य ९३ लाखाच्या घरात जाते. पावणे दोन कोटींची संपत्ती बाळगणाऱ्या भास्कर भगरे यांच्यावर २१ लाख १७ हजार रुपयांचे तर पत्नीवर तीन लाख २६ हजारांचे दायित्व आहे.