लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: ऐन उन्हाळ्यात सर्वच प्रवासी रेल्वे गाड्यांना तुडूंब गर्दी उसळलेली असतांना मध्य रेल्वे प्रशासनाने दररोज मनमाडमार्गे धावणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (पनवेलमार्गे) ही गाडी दोन्ही बाजूने २० मे ते १९ जूनपर्यंत रद्द केली आहे. तसेच भुसावळ-पुणे एक्स्प्रेसचा रॅक इगतपुरी-भुसावळ मेमू या गाडीसाठी संलग्न करण्यात आला आहे. मेमू या काळात दररोज धावणार आहे.

गाडी क्रमांक ११०२५/११०२६ भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरी-पुणे-इगतपुरी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. ११०२५ आणि ११०२६ या गाडीचा रेक गाडी क्र.११११९/१११२० भुसावळ-इगतपुरी-भुसावळ मेमू म्हणून चालविण्यात येणार आहे.

आणखी वाचा-टोमॅटोचा दर कोसळल्याने शेतकरी संतप्त; नाशिक बाजार समितीत शेतीमाल ओतून आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी क्र.११०२५ मेमू भुसावळ येथून रात्री ११.३५ वाजता निघेल आणि इगतपुरीला सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी पोहचेल. नंतर गाडी क्र.११११९ मेमू इगतपुरी येथून सकाळी ९.५५ वाजता निघेल व भुसावळ येथे सायंकाळी पाच वाजून १० मिनिटांनी पोहचेल. गाडी क्र.१११२० मेमू भुसावळ येथून सकाळी सात वाजता निघेल आणि इगतपुरी येथे दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी पोहचेल. नंतर गाडी क्र. ११०२६ इगतपुरी येथून संध्याकाळी पाच वाजून १० मिनिटांनी निघेल व भुसावळला रात्री १० वाजता पोहचणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे ही माहिती दिली.