लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक – भाजपचे ज्येष्ठ नेते, धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा नारायण सोनवणे यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.

शुक्रवारी प्रताप दादांचा ७५ वा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रतापदादा जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. त्यांना नाशिक महानगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यात पराभूत झालेल्या प्रतापदादांनी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवला. मतदारसंघ पूर्नरचनेत धुळे हा नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून २००९ मध्ये पहिल्यांदा ते विजयी झाले.

आणखी वाचा-नाशिक : चुंचाळे परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शैक्षणिक क्षेत्रात दादांचे मोठे योगदान राहिले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकांची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण (मविप्र) संस्थेचे अध्यक्ष व सभापती अशी पदे त्यांनी भूषवली होती. प्रतापदादा हे मूळचे बागलाणचे. त्यांचे वडिल दिवंगत नारायण सोनवणे हे बागलाण मतदारसंघाचे आमदार होते. प्रतापदादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाल्याची भावना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. प्रतापदादांनी कधीही सत्ता वा कसलाही मोह ठेवला नाही. आपले आयुष्य जनतेप्रती समर्पित केले. एक चांगला व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आपण गमावला आहे, असे भुसे यांनी म्हटले आहे.