नाशिक: दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची कौटुंबिक मालमत्ता पाच वर्षात दुप्पट झाली आहे. डॉ. पवार कुटुंबियांकडे ११ लाख रुपयांचे १५५ ग्रॅम सोन्याचे दागिने तर एक लाख आठ हजार रुपयांची १.३५ किलो चांदी आहे. विशेष म्हणजे, डॉ. भारती पवार यांच्यापेक्षा त्यांचे पती प्रवीण हे अधिक श्रीमंत आहेत.

हेही वाचा: नाशिकमध्ये महायुतीचे शक्तिप्रदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये डॉ. पवार कुटुंबियांची एकूण संपत्ती १२ कोटी २५ लाखाची होती. आता ती जवळपास २३ कोटींच्या घरात गेली आहे. पाच वर्षांपूर्वी या कुटुंबाची एक कोटी ३५ लाखाची चल आणि १० कोटी ९० लाखाची अचल संपत्ती होती. सद्यस्थितीत डॉ. पवार दाम्पत्याकडे एक कोटी ७० लाखाची चल आणि २० कोटी ८४ लाखाची अचल संपत्ती आहे. स्थावर मालमत्तेचे मूल्य वाढल्याने त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. डॉ. पवार यांच्याकडील चांदीच्या वस्तू या काळात दुपटीने वाढल्या. प्रवीण पवार यांच्यावर तीन लाखांचे कर्ज आहे. डॉ. पवारांकडे साडेपाच लाखांचे ८० ग्रॅम सोने आहे. विविध बँकांमध्ये १६ लाखाच्या ठेवी, १० लाखांचा विमा त्यांच्या नावे आहे. बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये त्यांनी सुमारे नऊ लाखाची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावे कुठलेही कर्ज नाही.