लोकसत्ता वार्ताहर

धुळे: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करिअर प्रबोधिनी सुरू करण्याचा मानस आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.

शिरपूर तालुक्यातील लौकी येथे आदिवासी विकास विभाग संचलित एकलव्य आदर्श निवासी शाळेची पायाभरणी डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खा. डॉ. हिना गावित, आमदार काशीराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, एकात्मिक आदिवासी प्रकल्प धुळेच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. गावित यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आदिवासी विकास विभागाने वसतिगृह इमारतींचे आराखडे तयार केले असल्याचे सांगितले. आदिवासी विकास विभागाच्या ज्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह इमारतींसाठी जागा उपलब्ध आहेत. अशा इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी दिले.

आणखी वाचा- राष्ट्रवादीचे नाशिककडे विशेष लक्ष; जयंत पाटील, अजित पवार यांच्यानंतर आता शरद पवार दौऱ्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आश्रमशाळेतील इमारत परिसरातच शिक्षकांसाठीही निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचे धोरण ठरविण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत चेहरा वाचन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आश्रमशाळेतच व्हावी याकरिता वैद्यकीय सुविधाही शाळेतच उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी क्षेत्रातील ज्या पाडे, वाड्या, वस्त्या, गावांमध्ये रस्त्यांची सुविधा उपलब्ध नाही तेथे रस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.