नाशिक – जुन्या वादातून अजय बागूल टोळीने तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांचा पुतण्या गौरव बागूल याचा समावेस आहे. सुनील बागूल यांचा दुसरा पुतण्या अजय फरार आहे.
२८ सप्टेंबर रोजी विसे मळा येथे सचिन साळुंके. मित्र सचिन सांगळे, ऋषीकेश जाधव असे तिघे जण खासगी मोटारीतून गोदावरीचा पूर बघण्यास गेले होते. सांगळे वाहन चालवत होता. रामवाडी येथे आले असता जुन्या घराची आठवण झाल्याने थांबले. येथे तुकाराम चोथवे, अजय बोरिसा उभे होते. जुने वाद असल्याने पुन्हा वाद नको म्हणून साळुंके, सांगळे, जाधव पुढे निघाले. विसे चौकात रात्री थांबले असता अजय बोरिसा सहकाऱ्यांसह त्याठिकाणी आला. बोरिसाने तिघांवर गोळ्या झाडल्या. सांगळे भीतीपोटी मोटार घेऊन पळून गेला. संशयितांनी इतर दोघांना मोटारीत बसवून रामवाडीत नेऊन मारहाण केली. या प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या गौरव बागूल संदिप शेळके, प्रेमकुमार काळे, विकी काळे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तुकाराम चोथवे, अजय बागूल, बाबु गोवर्धने, गोपाल दायमा फरार आहेत.