लोकसत्ता वार्ताहर

धुळे: बेकायदेशीरपणे गावठी बंदुका बाळगल्याच्या आरोपाखाली दोघांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून चार गावठी बंदुका, सात जिवंत काडतुसे असा एक लाख ९७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तपास अधिकार्‍यांना १० हजाराचे बक्षीस दिले.

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार इसरार फारूकी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नीलेश गायकवाड (३०, वडगाव हवेली. कराड) आणि मनिष सावंत (२२, सोमवारपेठ, कराड) या दोघांनी बेकायदेशीरपणे गावठी बंदुका बाळगल्या असल्याची माहिती मिळाल्यावरून हाडाखेड गाव शिवारातील तपासणी नाक्यावर गुरुवारी रात्री दोघांना पकडण्यात आले.

हेही वाचा… मालेगावात २९७ अतिक्रमणांवर हातोडा; अतिक्रमण हटाव मोहिमेस वेग

मुंबई-आग्रा महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. संशयित नीलेश आणि मनिष या दोघांविरूद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुन्हेगारी मोडून काढणार्‍या अधिकार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी १० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले. जिल्ह्यात गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून कढण्याचे आदेश देत अशा धाडसी अधिकार्‍यांच्या पाठिशी राहु, अशी ग्वाही दिली.