लोकसत्ता वार्ताहर

धुळे: जबर मारहाण झालेल्या अवस्थेत मालेगाव तालुक्यातील झोडगे शिवारात बेवारसस्थितीत फेकून दिलेल्या सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील महिलेचा दवाखान्यात मृत्यू झाला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून धुळे येथील ड्रीम्स हर्बल कंपनीच्या मालकास पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दोघे फरार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ठाणगाव येथील शीतल व्यवहारे (३२) ही महिला धुळे येथील अवधान शिवारात असलेल्या ड्रीम्स हर्बल कंपनीत दलाली तत्वावर काम करीत होती. कंपनीच्या व्यवस्थापनाशी काही कारणावरून तिचे वाद झाले होते. हा वाद मिटविण्यासाठी तिला २४ जून रोजी कंपनीत बोलाविण्यात आले होते. तेथेच तिला जबर मारहाण करण्यात आली.

हेही वाचा… निश्चितीनंतरही गाईच्या दूध दरात घसरण; शेतकरी संघटनेचा आक्षेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमी अवस्थेत तिला एका वाहनातून नेऊन २५ जून रोजी सकाळी झोडगे शिवारात टाकून देण्यात आले होते. जखमी महिलेला धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. चार जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शीतलचा चुलतभाऊ गौरव व्यवहारे याने २२ जुलै रोजी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित कंपनीचे मालक सुनील उदीकर, नवनाथ साकळे आणि योगेश माळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. उदीकर यास अटक करण्यात आली आहे.