जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. या भूकंपाचे धक्के नजीकच्या मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथेही जाणवल्याची अफवा आज शुक्रवारी पसरली. जिल्हा प्रशासनाने मात्र असे काही घडले नसल्याचे स्पष्ट केले.

आज शुक्रवारी सकाळी १०.३५ मिनिटांनी भुसावळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूगर्भात १० किलोमीटर आत केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. नाशिक स्थित निरीक्षण केंद्रापासून २७८ किलोमीटर अंतरावर हे धक्के जाणवले. जळगाव जिल्यातील भुसावळ, सावदा परिसरात हे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – जळगाव : भुसावळ परिसरास भूकंपाचे हादरे, ३.३ रिश्टर स्केल तीव्रता

हेही वाचा – नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीत चक्कर आल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या भूकंपाचे धक्के भुसावळ नजीकच्या मलकापूर येथे जाणवल्याची चर्चा रंगली. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. दुसरीकडे जळगावच्या सीमावर्ती भागातही धक्के जाणवले नसल्याचे वृत्त आहे.